Quick note on मटारूची भाजी

संपादन

तुम्ही आपले पहिले संपादन केले आणि मटारूची भाजी हे पान तयार केले त्याबद्दल तुमचे आभार. आपण असेच लेख येथे तयार करत रहाल ही आशा. बुक्स, विश्कनरी आणि स्त्रोत या प्रकल्पांवर अनुभवी सदस्य कमी आहेत त्यामुळे आपण येथे सक्रिय झालात तर खूप बरे होईल. धन्यवाद QueerEcofeminist🌈 ०७:४०, १७ ऑक्टोबर २०२२ (UTC)Reply

नमस्कार, धन्यवाद. मी फक्त mrwiki वर जास्त कार्यरत असतो. आपण साद द्याल त्याप्रमाणे येथे येऊन आपणास सहकार्य करेल. सद्य स्थितीत येथे कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे असे तुम्हाला वाटते?-संतोष गोरे (चर्चा) १४:२७, १७ ऑक्टोबर २०२२ (UTC)Reply
पाककृती वर काम करत राहिलात तरी खूप मदत होईल. QueerEcofeminist🌈 १५:३८, १७ ऑक्टोबर २०२२ (UTC)Reply
mrwiki वर जवळपास २०० पाने पाककृतीचे असून त्यातील काही पाने ही इतकी मर्यादित स्वरूपाची आहेत की, ते जर येथे स्थानांतरित केले तर शून्य लिखाण मागे उरेल. आपले मत काय आहे? तेथील लेख येथे स्थानांतरित करावे का? जर तेथील मजकूर इथे स्थानांतरित केला तर तेथे काही मजकूर वाढवावा लागेल. त्यासाठी अजून काही सदस्य आपल्याला लागतील. कृपया आपले म्हणणे मांडावे.-संतोष गोरे (चर्चा) १४:११, १८ ऑक्टोबर २०२२ (UTC)Reply
मुळात पाक कृती ही बाब विकिबुक्स परिघात येते विकिपीडियावर त्या पाककृतींची विश्वकोशिय माहिती असू शकते पाककृती नाही. त्यामुळे माझ्या मते सर्व पाककृती बुक्सवर हलवून विकीपिडियावरून डिलिट केल्या पाहिजेत. पण तिथल्या प्रचालकांना हे समजावून सांगणार कोण हा प्रश्न आहे. QueerEcofeminist🌈 १५:२५, २३ ऑक्टोबर २०२२ (UTC)Reply
दोनशे पैकी अनेक पाककृती मी आधीच आणल्या आहेत. उरलेल्याही आणता येतील पण मी थोड्या थोड्या आणतो आहे. जेणेकरून त्या इथे वाढवता येतील. QueerEcofeminist🌈 १५:२६, २३ ऑक्टोबर २०२२ (UTC)Reply