मटारू किंवा करांदा (शास्त्रीय नाव : Dioscorea bulbifera Linn)

मटारूची भाजी
वेळ 30 मिनिटे
काठीण्य पातळी
औषधी गुणधर्म -

हा कंद वात आणि कफ नाशक असून, पचनशक्ती वाढवणारा व वीर्यवर्धक आहे.

मटारूची भाजी

संपादन
साहित्य

मटारूचे कंद, गोड तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची/तिखट, लसुण, जिरे, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर, व फोडणीचा मसाला ई.

कृती

एक लोखंडी पातेले घेऊन त्यात पाणी तापवुन मटारूचे कंद आणि मिठ टाकून चांगले नरम होईपर्यंत उकडावे. कंद सोलुन त्याचे मध्यम ते छोटे तुकडे करावेत. पातेल्यात किंवा कढईत तेल ओतावे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा लाल होई पर्यंत तळावा. मग मिरची आणि लसुन तपकिरी होईपर्यंत शिजवावे. मग जिरे, मिठ, हळद आणि फोडणीचा मसाला टाकावे. नंतर त्यात चिरलेले मटारूचे कंद टाकुन शिजु द्यावे. आवश्यक वाटल्यास रस्साभाजी करावी. शेवटी चिरलेली बारीक कोथींबीर टाकावी.

पानांचे वडे

संपादन
साहित्य

मटारुची कोवळी पाने, बेसन, तेल, तिखट, मीठ, हळद.

कृती

प्रथम बेसन पाणी टाकून चांगले मळुन घ्यावे. त्यात चवीनुसार तिखट, मिठ आणि हळद टाकावी. हे मळलेले बेसन पीठ मटारूच्या पानावर लावावे. ही कोवळी पाने एकावर एक ठेऊन गुंडाळून घ्यावे. या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्याव्यात. शिजल्यावर यांच्या वड्या करुन तेलात तळून घ्याव्यात. ह्याची परत भाजी करता येईल किंवा तसेच खाता येईल.