नमस्कार,

आपणास कदाचित कल्पना असेल की फेब्रुवारी २०१२ च्या सुरुवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेसाठी स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिस्रोत प्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रिय योगदान आणि पाठिंब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदान बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.

विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्यपुस्तक निर्मिती व्हावी असा आहे. सध्या मराठी 'विकिबुक्स' मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.

वस्तुतः ज्ञानेश्वरी आणि इतर मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतर केले जात आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्री करून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.

आपण आपले सक्रिय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रकल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.

आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकार मुक्त साहित्याचे केलेले लेखन नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थित स्थानांतर झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.

आपला नम्र

Hello, Please don't leave your message here, contact me at enwiki or send me an e-mail