पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा सणाच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.(पोळी/पुरणाची पोळी ,गुजराती: પોળી, तमिळ: போளி पोली, कन्नड: ಹೋಳಿಗೆ ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु या बोब्बाटु या बोब्बाटलु या पोलेय्लु, भाकशालू).

पुरणपोळी

मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

पुरणपोळी माहिती

संपादन

महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .

पुरणपोळी तूप, ताक, दुध, गुळवणी किवा कटाची आमटी ह्या सोबत खातात. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटक मध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.

पुरणपोळीची पाककृृती

संपादन

साहित्य—

  1. ३०० ग्रॅम हरभरा डाळ
  2. ३०० ग्रॅम गूळ किंवा साखर
  3. एक छोटा चमचा वेलची पूड, जायफळ आणि सुंठ
  4. १५० ग्रॅम गहू पीठ किंवा मैदा
  5. पाणी

अपवाद : गुजरात मधे तूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

  1. प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.
  2. डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.
  3. शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.
  4. तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.
  5. गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची कणिक तयार करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये हळद वापरावी.
  6. नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजून घ्यावी.

इतर माहिती

संपादन

काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.
काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात. पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि पापड हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात. जेवताना ताटात गरमागरम पुरण पोळी गुळवणी ' 'आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. कटाची आमटी कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .

हेसुद्धा पहा

संपादन