कटाची आमटी हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ असून सणासुदीला सहसा पुरणपोळीबरोबर तयार केला जातो. कटाची आमटीला काही ठिकाणी कढी असे संबोधतात. विशेष म्हणजे कटाची आमटी हा पुरण पोळी या मुख्य पदार्थापासून बनवला जाणारा एक पदार्थ आहे. त्यासाठी वेगळी अशी कोणतीही फळ-पाले भाजी आवश्यक नाही.

आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 
  १) ५००-६०० मिलीलीटर डाळ निथळून काढलेले पाणी 
  2) खाद्य-तेल फोडणीसाठी चार चमचे (मध्यम आकाराचे) 
  ३) जिरे-मोहरी प्रत्येकी एक छोटा चमचा 
  ४) हिंग चिमटभर 
  ५) कडीपाला
  ६) लाल तिखट किंवा काळे तिखट चवीनुसार 
  ७) आले-लसुन पेस्ट एक चमचा 
  ८) मीठ चवीनुसार 
  ९) गरम मसाला किंवा गोड मसाला (आवडीनुसार)
  १०) एक कांदा, खोवलेला नारळ आणि कोथिऺबिर 

पुरणपोळीसाठी चण्याची डाळ शिजवून घ्यावी, ती चाळणीत निथळून घ्यावी. शिजलेल्या डाळीचे निथळून जमवलेले पाणी आमटीसाठी वापरावे. असे पाणी निघालंच नाही तर पुराण पत्रात वर राहिलेले पुरण या आमटी साठी वापरता येते.तेलावर हिंग, जिरे, मोहरी, कडीपता फोडणी करून त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण घालून परतावे. कांदा चांगला भाजावा नंतर त्यावर लाल तिखट / लाल मसाला टाकून परतावे. ते सर्व करपू न देता लगेचच मघाशी डाळ निथळवून काढलेले पाणी ओतावे. चवीनुसार मीठ घालून चांगला कढ काढावा. आमटीला उकळी आली की त्यामधे थोडा खोवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर घालावी.