कठोर पण सभ्य टिका कशी करावी

संसदीय/सभ्य भाषेच्या परिघात राहून कठोर शब्दात टिका कशी करावी या विषयावर लेख लिहून हवा आहे.

  • Some attitudes may be named... which are central in effective intellectual ways of dealing with subject matter. Among the most important are directness, मनाचा खुलेपणा, single-mindedness (or whole-heartedness), and responsibility.-

कठोर व्यक्तिगत

संपादन

सौम्य : १. आपणा कडून ही अपेक्षा नव्हती / जास्त अपेक्षा होती.

कठोर : २.हया वेळी जरा आपण कमी पडलात - पुढच्या वेळी जास्त प्रयतन अपेक्षित आहेत - अन्यथा काही पर्याय शोधावा लागेल.[]

  • स्पष्ट बोलल्याबद्दल माफ करा, पण तुमच्या लिखाणात मला अपेक्षित उंची आढळली नाही. काही तरी नवे मिळेल या आशेने वाचायला सुरुवात केली होती, परंतु तेच घासून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग आणि कंटाळवाणी वाक्यरचना पाहून निराशा झाली.
तुमच्यासारख्या लेखकांना प्रभावी व्हायचे असेल तर याहून जास्त गांभीर्याने लिहावे लागेल आणि तुम्हाला त्याहून जास्त वाचनाची आवश्यकता आहे हे नमूद करते. यापुढील लेखन अभ्यासपूर्ण आणि जास्त वाचनीय असेल अशी आशा व्यक्त करते.

कठोर प्रतिसाद

संपादन
  • विचारलाय प्रश्न, पण प्रश्नाआडून केलेली सूचना वाटतेय ही.
  • जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी.
  • नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करत (करुन राहीला) आहात ?
  • ........च्या मागणीत उगाच आडवे पडताय हं तुम्ही
  • एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो, तुम्हीही अगदी हेच करता. आपल्याला स्पर्धक निर्माण होत आहे या भीतीने तुम्ही हा प्रतिसाद दिला आहे का?
  • .......राव तुम्ही सर्वात "वीक" सदस्य पाहून हे जे टीकेचं मोहोळ उठवलं आहेत ना ते आक्षेपार्ह आहे. आपल्या कोत्या मनोवृत्तीचा त्रिवार निषेध करावा तरी थोडाच आहे!
  • दुसर्‍या संस्थळांवर तुमच्या कसल्याही लिखाणाला वाहवा मिळते म्हणून कृपया तुमचे सगळे लिखाण इथे आदळू नये. एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून सांगतो/ते, इथल्या चोखंदळ वाचकांना कृपया गृहीत धरू नये..........
  • कठोर टीका आहे पण रचनात्मक काही दिसत नाही..............टीका रचनात्मक आहे किंवा नाही तो ते समजून घेणे हे लेखकावर अवलंबून आहे. कठोर टीका करणे सोपं आहे, पण त्यातून रचनात्मक संदेशही गेला पाहिजे, ते बहूतेक होत नाही. अमूक अमूक लिहिणारा फाल्तू लिहितो तेव्हा ते फाल्तूपणा कुठे कसा आहे हे सांगितलं पाहिजे, म्हणजे हे 'खर्रच हे लिहिण्यात नको होतं का ' असा विचार लिहिणार्‍याच्या मनात आला पाहिजे, लिहिण्यापासून नाऊमेद करणं म्हणजे कठोर टीका नव्हे. असो.
    • ...........नुसत्या टिकेने कोणी लिहिण्यापासून नाऊमेद होत असेल तर त्या मनुष्याची किव वाटते.
  • ............माणसं हळवी असतात, माणसं कठोर असतात. काहींना मोजक्या शब्दांचा मार पुरेसा असतो, काहींना कितीही लिहा काहीही फरक पडत नाही. 'रचनात्मक टीका स्वीकारताही आली पाहिजे' टीका करणार्‍याने काही कठोर टीकेबरोबर रचनात्मक टीकाही केली पाहिजे, इतकेच म्हणायचे होते. बाकी, फाट्यावर मारणे, अनुल्लेखाने मारणे, दुर्लक्ष करुन निव्वळ समाचार घेणे, टोमणे, येता-जाता ढुसण्या, चिमटे, मला वाटतं हे केवळ कठोर टीकेत येतं. कठोर टीकेबरोबर 'रचनात्मक टीकेवर' फार काही प्रतिसादात आलं नाही.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. http://www.misalpav.com/node/24056