"स्त्रीवाद, संकल्पना आणि सिध्दांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. Pywikibot 3.0-dev
खूणपताका: no header मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
[[दलित]] [[स्त्रीवाद]] [[(Dalit Feminism)]] ही एक [[राजकीय विचारसरणी]] आहे. १९९६ साली [[गोपाळ गुरु]] यांच्या ''दलित वुमेन टॉक डिफरेन्टली'' (Dalit women talk differently) या लेखाद्वारे दलित स्त्रीवादाची चर्चा सुरु झाली.<ref>http://www.epw.in/commentary/dalit-women-talk-differently.html</ref> यापूर्वीदेखील १९९० पासूनच दलित स्त्रियांच्या वेगळ्या संघटनांमधून वेगळ्या दलित स्त्रीवादाची मांडणी चळवळीच्या पातळीवर होत होती. मुख्यप्रवाही स्त्रीवाद आणि दलित चळवळ यांनी दलित स्त्रियांच्या प्रश्नाकडे सिद्धान्ताच्या, विश्लेषणाच्या व कृतीच्या पातळीवर दुर्लक्ष केले हा तात्कालिक संदर्भ होता. त्याचप्रकारे [[फुले-आंबेडकरी चळवळी]]तील स्त्रियांच्या सहभागाचा ऐतिहासिक संदर्भही या चर्चेच्या पार्श्वभूमीला होता.<ref>पवार, ऊर्मिला आणि मून, मीनाक्षी(२०००).आम्हीही इतिहास घडवला.सुगावा प्रकाशन,पुणे</ref>
== पार्श्वभूमी ==
फुले आंबेडकरी चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता.[[जोतीराव फुले|जोतीराव फुल्यांनी]]व [[सावित्रीबाई फुले|सावित्रीबाई फुल्यांनी]] स्त्रीशिक्षणाची सुरुवात करुन (१८४८) दलित स्त्रियांनाही शिक्षणाची कवाडे खुली केली. यातीलच एका शाळेतील विद्यार्थीनी [[मुक्ता साळवे]] हिने ''आम्हां महारामांगांचा धर्म कोणता?''या निबंधातून दलित स्त्रीचे मातृत्वाचे [[अनुभव]] उच्चवर्णीय स्त्रियांच्या अनुभवांपेक्षा भिन्न आहेत अशी मांडणी केली. आंबेडकरी चळवळीतूनही [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीआंबेडकर]]ांनी ''स्त्रिया या जातिव्यवस्थेची प्रवेशद्वारे आहेत'' यातून [[जात]] व [[स्त्रीप्रश्न]] यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला.मात्र आंबेडकरोत्तर रिपब्लिकन पक्षाचे राजकारण, [[दलित पँथर]], नामांतर चळवळ आदी [[दलित चळवळ|दलित चळवळींनी]] दलित स्त्रीचा प्रश्न स्त्रीप्रश्न आहे असे मानून त्याकडे दुर्लक्ष केले. या चळवळींचा केंद्रबिंदू नेहमी दलित पुरुष होता.
स्त्रीवादी चळवळीने ७०च्या दशकापासून भारतात अधिक राजकीय कृती करण्यास सुरुवात केली. हुंडाविरोधी आंदोलने, बलात्कारविरोधी आंदोलने, घरगुती हिंसाचारविरोधी चळवळी यातून भारतातील स्त्रीवाद चळवळ सिद्धान्त व व्यवहाराच्या पातळीवर विकसित होत होता. या स्त्रीवादी चळवळीने दलित स्त्रीचा प्रश्न हा जातीचा प्रश्न आहे असे मानून त्याकडे दुर्लक्ष केले. या चळवळीचा केंद्रबिंदू नेहमी उच्चवर्णीय स्त्री होती.