विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/4
- स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.
- मी आजपासून चोरी करणार नाही केली तर मला मारावे.
या वाक्यात स्वल्पविराम ‘नाही’ या शब्दानंतर न देता जर ‘करणार’ या शब्दानंतर दिला; तर अर्थाचा अनर्थ होईल!
जसे :
- मी आजपासून चोरी करणार नाही, केली तर मला मारावे.
- मी आजपासून चोरी करणार, नाही केली तर मला मारावे.