विकिबुक्स:धूळपाटी
मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ?
मनाचा खुलेपणा म्हणजे काय ?
संपादनअस्तीत्वाच्या वस्तुस्थिती बद्दल आपल्या समजांची जाणीवेस प्रगल्भता येणे, आपल्या नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असण्यावर अवलंबून असते.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा असणे.
जेव्हा एखाद्या गोष्टी बद्दल माहिती उपलब्ध नसते (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती अनएक्सप्लेन्ड आहे इतर लेबल लावण्याची घाई नकरता,माहिती उपलब्ध नाही अनएक्सल्पेन्ड आहे एवढेच तथ्य स्विकारता आले पाहीजे.चुकीचा प्रमाण लावण्यातील घाई चुकीच्या अर्थबोधास कारणी भूत होण्याची शक्यता असते वरवरचे धागे जुळवून शितावरून भात म्हणत सुतावरून स्वर्ग गाठला जाऊ शकतो आणि साप साप म्हणून भूई थोपटली जाऊ शकते.पर्यायी कारणमिमांसांच्या शक्यता, की ज्यात वैध शक्यता आंतर्भूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा सर्व शक्यता पुरेसा अवधी न दिला जाताच बाद केल्या जातात;ग्राह्य शक्यता कोणत्या आहेत ते सुस्पष्ट होण्या पुर्वीच, त्यांची शक्यता नाकारणे म्हणजेच बंदीस्त मनाचे असणे अथवा क्लोज माइंडेडनेस होय.
- 'क्ष' गोष्टीची कारणमिमांसा उपलब्ध नसणे, हा 'ज्ञ' गोष्ट बरोबर असल्याचा पुरावा नसतो. -हा विरोधाभास एक तार्कीक उणीवेचा प्रकार आहे
- माझ्याकडे क्ष गोष्टीची कारणमिमांसा उपलब्ध नाही = माझ्याकडे कारणमिमांसा उपलब्ध आहे हे दोन्ही परस्पर विरोधी दावे एकदम केल्या सारखे आहे.
- ज्या गोष्टीची कारण मिंमासा उपलब्ध नसते =त्याची कारण मिमांसा उपलब्ध नसते एवढे आणि एवढेच त्या पलिकडे काही नाही.
माझ्या अनुभवाची मी कारण मिमांसा देऊ शकत नाही, म्हणून माझा श्रोताही माझ्या अनुभवाची कारण मिमांसा देण्यात अपात्र आहे, म्हणून माझा अनुभव आणि मी स्वत:च केलेला कयास बरोबर आहे ही एक तार्कीक उणीव असते आणि अयोग्य असते कारण त्रयस्थ व्यक्तीस संबधीत गोष्ट स्वतंत्रपणे पडताळण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध नसते.त्रयस्थ व्यक्ती तुम्ही गाळलेले अथवा तुमच्या अनवधानाने गळालेले मुद्दे आणि विवरण स्वतंत्रपणे तपासू शकत नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी 'क्ष' गोष्टीवर विश्वास नाही म्हणजे त्याला 'क्ष' सत्य असूच शकत नाही असे म्हणायचे असते असे नाही क्ष सत्य असूच शकत नाही म्हणत असेल तर तो झाला क्लोज माइंडेडनेस; पण विश्वास नाही पण तर्कसुसंगत पुरावे आल्यास विश्वास ठेवेन हा झाला ओपन माईंडेडनेस.
दुसरी व्यक्ती तुमच्या मतांशी सहमत होण्यास असमर्थ असल्या मुळे तुम्ही तुमची परिपेक्षाची जाणीव हरवुन बसत असाल, तर दुसऱ्या व्यक्तिशी संपर्कात येताना तुम्ही तुमचे पुर्वग्रह लादू लागता आणि ऐकण्याच्या कौशल्यात अडथळे येऊन संपर्कात येणे होते पण संपर्काचे संवादात रूपांतरण साध्य होत नाही तर केवळ आपल्याच पुर्वग्रहांचा तो पुर्नसराव असतो आणि हाच क्लोजमाइंडेडनेस झाला.
ओपन मांडेडनेस काय नाही
संपादन- माझ्याशीच सहमत व्हा अशा भूमीका
- सुयोग्य शहानिशा न करता, कुणीही सहज मन वळवू शकतं हा चांगला गूण समजला जात असला तरी प्रत्यक्षात तसे नसते
- ओपन माइंडेड आहे या नावाखाली कोणत्याही अविश्वासार्ह spooky पॅरानॉर्मल स्टोऱ्यांवर विश्वास ठेवणे.
क्लोज माइंडेड काय नाही
संपादन- विश्वास ठेवण्यापूर्वी विश्वासार्ह संदर्भाची अथवा पुराव्याची अपेक्षा करणे . सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीस संदर्भ मागणे ॲबसर्ड असु शकते.सिनेमातील कथानके खरी नाहीत म्हणून आपण पहावयाचे सोडून देत नाही.पण जेव्हा कुणी आपल्याला एखादी गोष्ट फॅक्ट म्हणून स्विकारावयास सांगत किंवा रिस्क घेण्याची अपेक्षा करत तेव्हा ग्राह्य संदर्भ आणि पुरावे आपल्याला दाव्यांची सत्यासत्यता पडताळण्यास मदत करतात.ज्या जगात तुमचे हितसंबंध गुंतले आहेत तेथे रास्तवेळी शहा निशा करणे रास्त असते
ओपन माइंडेडनेस क्रिटीकल थिंकींगशी अनुरूपच असतो,क्रिटीकल थिंकींग ओपन माईडला सक्षम करते.संदर्भ अथवा पुरावा मागीतल्या मुळे क्वचीत चांगल्या युक्तीवाद आणि संदर्भांच्या अभावी चांगल्या कल्पनाही नाकारल्या जाऊ शकतात.चांगल्या कल्पने बद्दल जेव्हा जेव्हा पुरावे गोळा होऊ लागतात तेव्हा ओपन माईंड त्यांचा पुर्नविचार करू शकते आणि पुर्वी स्विकारलेल्या चुकीच्या कल्प्नांचा त्याग करू शकते.
तुम्ही जर ओपन माइंडेड असाल पण संदर्भ अथवा पुरावा मागत नसाल तर तुम्ही वस्तुस्थितींबाबतची तुमची समजूत योगायोगावर सोपवत असता.यातली सर्वात वाईट शक्यता अशी की तुम्ही एखादी उणीवयूक्त कल्पना स्विकारली आणि त्यानंतर इतर संकल्पना पर्यायांना तुम्ही तुमच माईंड क्लोजकरून घेतल तर चांगले संदर्भ आणि पुरावे असलेल्या कल्पना सुद्धा नाकारल्या जाऊ लागतात, आणि तुमची स्वत:ची काही चांगले शिकण्याची क्षमता मार खाते.
जर तुम्ही इतर विरोधी पुरावे आणि विरोधी युक्तीवाद न ऐकता इतरांनी तुमच्या कल्पना शहानिशा न करता स्विकाराव्यात तर हे केवळ तुमच मन मुक्त नसण्याचच लक्षण नाही तर ओकाची पायानसलेली गृहीत धारणा,उद्धटपणा, नियंत्रण या गोष्टी सोबतीने आपल्या स्वभावात येण्याची शक्यता असते.
इतरांनी त्यांय्चा महत्वपूर्ण द्र्ष्टीकोणात बदलाची अथवा त्यांनी महत्वाची जोखीम पत्करण्यापूर्वी इतरांनी जर तुम्हाला संदर्भ अथवा पुराव्यांची अपेक्षा करणे तुम्हाला अनरिझनेबल गैरवाजवी वाटत असेल, जर तुमचा दावा इतरांनी त्यांचे क्रिटीकल थिंकींग बंद करावे अशी अपेक्षा करत असेल याचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीने कमी पुराव्यांची अपेक्षा ठेवावी असे होत नाही तर तुम्ही त्यांच्याकडे अधिक पुराव्यांची अपेक्षा ठेऊ शकता .
- इतरांना ओपन माईंडेड होण्याचा ॲड्व्हाईस देण्यापुर्वी बाकीच्या लोकांनी ॲक्सेप्ट केलेल्या आणि तुम्ही कंसीडरेशन न देता नाकारलेल्या आयडीयांबद्दल विचार करा.कदाचित तुमच्याच सल्ल्याची तुम्हाला स्वत:लाही खूप अधिक गरज असू शकते .
- संदर्भ आणि पुराव्यांची अपेक्षा न करणारे ओपन माईंड खूप सगळ्या अयोग्य गोष्टीही स्विकारू शकते.
- तुमचे डोके संमजसपणा आणि हुशारी ने भरा.
-->