मुगाला मोड आणून केलेल्या उसळीला मुगाची उसळ म्हणतात.

मुगाची उसळ पाक कृती संपादन

मुगाची उसळ

साहित्य :- १) मोड आलेले मूग पाव किलो २) कोथिंबीर पाव वाटी ३) धने-जिऱ्याची पूड दोन चमचे ४) आवडीप्रमाणे लाल तिखट ५) तेल दोन मोठे चमचे ६) फोडणीचं साहित्य ७) चवीपुरतं मीठ व चिमुटभर साखर .

कृती :- १) मूग आधी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत . असं करायचं नसेल तर प्रेशर पैनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात मोडाचे मूग , धने-जिरे पूड , लाल तिखट , मीठ , चवीपुरती साखर , पाव वाटी कोथिंबीर आणि एक वाटी पाणी घालून मंद आचेवर दहा मिनिटं शिजू दयावं . २) नंतर खाली काढून डिशमध्ये घालताना लिंबाची , टोमाटोची चकती व कोथिंबीरीनं सजवावी .