भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नपदार्थ आहे.[] महाराष्ट्रात भाकरी करण्याच्या विविध पद्धती दिसून येतात.[] भाकरी हा आहारदृष्ट्या शरीरासाठी पौष्टिक अन्नपदार्थ मानला जातो.[]

भाकरी थाळी
तव्यावर भाजण्यासाठी ठेवलेली भाकरी
तव्यावर फुगलेली भाकरी

पाककृती

संपादन

पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी /तांदूळ यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते.[] तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो.[] काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.

खाण्याच्या पद्धती

संपादन

छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, पालेभाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते पण विशेषत: पिठ्ल्याबरोबर भाकरी खाल्ली जाते.

ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटेथालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते.[] झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. १.० १.१ Kapoor, Sanjeev; Kapoor, Alyona (2005). Konkan Cookbook (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-216-4.
  2. २.० २.१ Khandekar, Saee Koranne- (2019-10-31). Pangat, a Feast: Food and Lore from Marathi Kitchens (इंग्रजी भाषेत). Hachette India. ISBN 978-93-88322-92-8.
  3. Salunkhe, D. K. (1984). Nutritional and Processing Quality of Sorghum (इंग्रजी भाषेत). Oxford & IBH Publishing Company.
  4. Dandekar, Vaidya Suyog (2013-09-01). Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti. Sukrut Prakashan, Pune. ISBN 978-81-909746-9-1.
  5. Desāī, Raṇajita (1990). Mekha mogarī. Mehatā Pabliśiṅga Hāūsa.