पराटा
पराटा | |
---|---|
वेळ | 30 मिनिटे |
काठीण्य पातळी |
संक्षिप्त माहिती
संपादनहा मुळचा पंजाबी पदार्थ आहे. महाराष्ट्रात याला तिपोडी पोळी म्हणतात.हा पोळी व पुरी या मधील पदार्थ आहे.पुरी पेक्षा कमी तेलकट व पोळी पेक्षा जास्त तेलकट. यात पुष्कळ प्रकार आहेत.प्रत्येकाच्या आवडीनुसार व रुचीनुसार यात बदल करता येतात.पराटे व भाजी वेगवेगळी करण्याऐवजी एकत्र करुनही (मेथी/पालक/आलु,कोबी)ते बनविता येतात.हा थालीपीठाचाच प्रकार आहे-फक्त लाटुन करता येणारा पदार्थ आहे.
साहित्य
संपादन- गव्हाचे पिठ (कणिक)२/३,मैदा १/३
- तेल(गोडेतेल)
- तिखट
- हळद
- मिठ
- कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले(सर्व ऐच्छीक)
- धने कुट/जिरे कुट/काळा मसाला/मिरपुड (हवे असल्यास आवडीप्रमाणे)
पुर्वतयारी
संपादनप्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले इ. टाकावयाचे असल्यास, निट धुवुन चिरुन घ्यावे.
कृती
संपादनकणिक घेउन त्यात थोडे गोडेतेल घालावे.वरील सर्व वस्तु आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.मग पाण्याने कणिक भिजवावी. त्याचा गोळा बनवावा.गोल लाटुन त्याला तेल लावून मग दोन घड्या घालाव्या. तव्यावर थोडे भाजुन मग त्यावर तेल घालावे. मंद आचेवर शिजु द्या नंतर उलथवुन पुन्हा थोडे तेल घाला व शिजु द्या.
सजावट
संपादनसाधा पराटा भाजी सोबत खाता येतो.रोजच्या जेवणाताला पदार्थ असल्यामुळे विशेष सजावट नाही.