ताक
ताक हा एक दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे.
दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते. केवळ दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
ताक हे दही किंवा सायीपासून बनवल्या जाते. एक भाग दही आणि दोन भाग पाणी एकत्र करून, घुसळले असता त्यातून लोणी वेगळे होते आणि उरते ते ताक. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो. ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात, त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते.
पोषणमूल्य
संपादनलोणीविरहित १०० ग्रॅम ताकाचे साधारणतः पोषणमूल्य-
लोणीविरहित ताक | पोषणमूल्य |
---|---|
ऊर्जा | १६९ कि. ज्यूल्स (४० किलो कॅलरीज) |
कार्बोदके | ४.८ ग्रॅम |
स्निग्ध पदार्थ | ०.९ ग्रॅम |
प्रथिने | ३.३ ग्रॅम |
कॅल्शियम | (१२%) ११६ मिलिग्म. |