गोडांबा
मुरंबा/गुळंबा/गोडांबा-एक आंबट-गोड पदार्थ
गोडांबा | |
---|---|
वेळ | २०-२५ मिनिटे |
काठीण्य पातळी |
लागणारे साहित्य -
संपादन- कैरीचा किस- १ वाटी,
- बारिक चिरलेला गुळ -१ वाटी,
- वेलची पुड - २ चमचे,
- चवीपुरते मीठ
(हवे असल्यास घरचे तिखट-१ चमचा)
कृती-
संपादन- सर्वप्रथम कढई मंद आचेवर ठेवावी,त्यात चिरलेला गुळ घालावा.
- गुळाला पाणी सुटू लागल्यावर त्यात कैरीचा किस घालावा.
- कैरी व गुळाचे प्रमाण साधारण एकसारखे असावे, आपण कमी गोड खात असल्यास एक चतुर्थांश गूळ कमी घालावा.
- वरील मिश्रणात दोन चमचे वेलची पुड घालावी. चवीपुरते मीठ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
- थोडा तिखटपणा हवा असल्यास घरचे तिखट १चमचा घालावे.
- साधारण ह्या कृतीस १०-१२ लागतील.
- एका हवाबंद डब्यात काढुन फ्रिजमध्ये अर्धा ता सेट करायला ठेवावे.
- आता गोडांबा तयार आहे. साधरण पोळी बरोबर किंवा पुर्ण जेवणाबरोबर आपण पानात वाढू शकतो.