गाजर हलवा
गाजर हलवा हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते.हा एक गोड पदार्थ आहे.
गाजर हलवा | |
---|---|
वेळ | मिनिटे |
साहित्य:-
- किसलेले गाजर: २ कप
- दूध: ३ कप
- वेलदोडा पुड: १/२ टी स्पून
- साखर: १/२ कप (चविनुसार)
- तूप: २ टेबल स्पून
- बारीक कापलेले काजू आणि बदाम: २ टेबल स्पून , बेदाणे: १ टेबल स्पून
कॄती:
- एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध गरम करायला ठेवा. अधून मधून दूध हलवत रहा. हे दुध जितके जास्त आटवता येईल तितके आटवायचे आहे.
- गाजर किसून घ्या.
- एका वाटीत दुध घेऊन त्यात काजु, बदाम, बेदाणे भिजायला ठेवा.
- एका भांड्यामधे तूप गरम करा. ह्या तुपात किसलेले गाजर ४-५ मिनिटे परतून घ्या.
- गाजर थोडे शिजल्यावर त्यात आटवलेले दूध घाला. दूध आटेपर्यंत हे गाजर शिजवा.
- नंतर त्यात साखर, काजू, बदाम, बेदाणे, वेलदोडा पुड घाला आणि सगळे नीट एकत्र करा व हा हलवा अजून ४-५ मिनिटे शिजवा.