कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/कोविड-१९
कोविड-१९ हा एक विषाणुजन्य सांसर्गिक आजार आहे. हा आजार कोरोना ह्या प्रजातीतील नव्याने आढळलेल्या विषाणूमुळे होतो. कोविड-१८ ह्या आजारात प्राधान्याने श्वसनसंस्था बाधित होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या ह्या आजारात अगदी सौम्य, श्वसनाशी संबंधित नसलेल्या लक्षणांपासून ते श्वसनसंस्थेचा तीव्र आजार, श्वसनेंद्रिय निकामी होणे आणि मृत्यू होणे इतपत गंभीर लक्षणेही रुग्णांमध्ये आढळतात. [१]
कोविड-१९चा संसर्ग
संपादनकोविड-१९चा संसर्ग व्यक्तींना दोन तऱ्हेने होऊ शकतो. संसर्गित व्यक्तीच्या जवळ असताना तिच्या श्वसनसंस्थेशी संबंधित उत्सर्गातून शिंतोडे उडाल्यामुळे किंवा संसर्गित व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंशी संपर्क आल्याने. अनेकदा संसर्गित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतात. अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही ह्या आजाराची लागण होऊ शकते असे दिसून येते.[२]
- बिंदूजन्य/ शिंतोड्यांद्वारे होणारा संसर्ग : उपलब्ध माहितीनुसार कोविड-१९ ह्या आजाराचा संसर्ग हा माणसांमध्ये प्राधान्याने श्वसनसंस्थेद्वारे बाहेर टाकण्यात येणाऱ्या पदार्थातील थेंबांद्वारे (शिंक, कफ इ.) होतो आणि ज्या व्यक्तीला संसर्ग होतो तिच्या शरीरातील डोळे, नाक, तोंड इ. अवयवांशी ह्या बिंदूंचा संपर्क आल्याने हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीच्या १ मीटर अंतराच्या परिघात एखादी अन्य व्यक्ती आली असता संसर्गित व्यक्तीच्या शिंक, खोकला इत्यादींचे शिंतोडे उडाल्याने अथवा अशा व्यक्तीच्या स्पर्शाद्वारे अन्य व्यक्तीला लागण होऊ शकते. [३]
- 'संसर्गित वस्तूंद्वारे होणारा संसर्ग' : संसर्गित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात असलेल्या वस्तूंद्वारे कोविड-१९चा संसर्ग होऊ शकतो.[४]
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- (इंग्लिश भाषेत) https://apps.who.int/iris/rest/bitstreams/1279750/retrieve. दि. ०६ जून २०२० रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)