कांदे पोहे किंवा पोहे हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा बहुतेक वेळा संध्याकाळी किंवा कुणी पाहुणे आले तेव्हा नाश्ता म्हणून खाल्ला जातो.

कांदे पोहे
वेळ मिनिटे

साहित्य :

  1. जाड पोहे
  2. चिरलेले कांद्याचे काप
  3. चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  4. हळद
  5. मोहरी, जिरे
  6. खाद्यतेल / गोडेतेल
  7. मीठ
  8. शेंगदाणे

पूर्व तयारी :
पोहे क‍रण्या अगोद‍र पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. १} जाड पोहे २} पातळ पोहे

पाककृती

संपादन

पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}कमी मारावा लागतो.

कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे. तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परता.

सजावट :
खायला देताना कोथिंबीर व खोबऱ्याचा किस टाकुन द्यावे. आणि त्यावर मिरची चे बारीक काप टाकुन घ्या.

इतर माहिती:

  1. कांद्याचे प्रमाण थोडे कमी करून त्यात उकडलेले/कापा करून थोडे तळलेले बटाटे घातल्यास हे आलूपोहे होतात.
  2. पोहे तयार करताना तुमच्या आवडीनुसार त्यात शेंगदाणे, बटाटा किंवा हिरवा वाटणे ही घालू शकता. कांद्याबरोबर या गोष्टी परतून घ्या.