कलाकंद हा भारतातील, विशेषत: देशाभरात विविध भागात, विविध बदल करुन तयार केला जाणारा खाद्यपदार्थ आहे. भारतीय उपखंडात पाकिस्तान व बाग्लांदेशात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत.

कलाकंद
वेळ २०-२५ मिनिटे
काठीण्य पातळी
कलाकंद

लागणारे साहित्य -

संपादन
  • ३/४ कप फाटलेले दुध
  • ८ चमचे दुधाची भुकटी
  • १/२ कप मलई
  • १/४ कप साखर
  • १०-१२ बदाम, पिस्ते
  • १/२ चमच वेलची पूड
  • चांदीचा वर्ख
  • एका भांडयात फाटलेले दुध, साखर,मलई आणि वेलची पूड यांचे मिश्रण करुन घ्यावे.
  • वरिल मिश्रण १०-१५ मिनिटे मंद आचेवर ढवळत राहावे.
  • मिश्रण खाली लागणार नाही तसेच मिश्रण उतू जाणार नाहीयाची काळजी घ्यावी.
  • मिश्रण चांगले घट्ट होऊ द्यावे.
  • आता एका बशीत थापून, ठंड होण्याकरता ठेऊन द्यावे.
  • बर्फीच्या आकारत कापून घ्या, सजावटीसाठीवरुन चांदीचा वर्ख, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे घालावेत.
  • कलाकंद खाण्यास तयार आहे.