इंटरनेटवर सापडलेल्या माहितीची तपासणी

प्रास्ताविक

संपादन

आपल्याला अनेकदा इंटरनेटवर किंवा आपल्या मोबाईलवर अनेक प्रकारची माहिती व्हिडीओ, ऑडीओ किंवा लेखांच्या माध्यमातून मिळते. ती माहिती आपल्या जीवनातल्या आवश्यक घटकांबद्दलचीही असते त्यामुळे आपण अनेकदा त्यावर विश्वास ठेवतो आणि आपले नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. ह्या प्रकारच्या माहितीने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि विज्ञाननिष्ठा किंवा प्रयोगशीलता काय असते याची ओळख होण्यासाठी हे पुस्तक मदत करेल अशी आशा ठेवून हा लेखन प्रपंच मी हातात घेतला आहे.

माहितीचे प्रकार

संपादन