आळूवडी

आळूवडी
वेळ ४५ मिनिटे
काठीण्य पातळी

आळूवडी हा महाराष्ट्रीय व गुजराती थाळीतील एक रुचकर गोड पदार्थ होय.

लागणारे साहित्य : संपादन

  • आळूची पाने
  • बेसन
  • चिंचेचे पाणी
  • तिखिट
  • हळद
  • मीठ
  • साखर
  • खाद्यतेल
  • पांढरे तीळ
  • ओवा

कृती : संपादन

  • सर्व प्रथम आळूची पाने धुऊन, पानाच्या शिरा काढून घ्याव्या.(आळूची पाने हाताळताना हातना खाज येण्याची शक्यता असते काळजी घ्यावी.)
  • एका भांड्यात २ वाट्या बेसन, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ कप चिंचेचे पाणी (ह्या ऐवजी लिंबाचा रस घेतला तरी चालेल), पांढरे तीळ, साखर, चवीपुरते मीठ, चिमूठभर ओवा मिश्रण एकजीव करुन घ्यावे, मिश्रणात १/२ कप पाणी घालावे.
  • वरील मिश्रण हाताने पानाच्या मागे लावावे. एकावरएक अशी किमान २-३ पाने अश्याच प्रकारेकरुन गोल विडा करुन घ्यावा.
  • एका पातेल्यात पाणी घ्यावे. त्यावर एक चाळणीत पातळ फडके घेऊन विडे ठेवावेत. आता एक झाकण ठेऊन साधारण (१५-२०मिनिटे) मोदकाप्रमाणे वाफवून घ्यावे.
  • अलगद विडे काढून घ्यावेत, त्याचे गोल काप करुन घ्यावेत व कमी आचेवर तळून घ्यावेत.
  • त्यावर कोथिंबिर, खोबर्याचा किस घालून पानात वाढावे.
  • आळूवडी खाण्यास तयार आहे.