आंतरात्मिक शिक्षण (Psychic Education)
आंतरात्मिक शिक्षण (Psychic Education) यामध्ये स्वत:च्या अंतरंगात डोकावून तेथे अंतरात्म्याचा शोध घेणे यास महत्त्व आहे. अंतरात्म्यास पूर्णयोगाच्या परिभाषेत चैत्य पुरुष (Psychic Being) अशी संज्ञा आहे.
यामध्ये २ गोष्टी महत्त्वाच्या असतात.
१) चैत्य पुरुषाचा शोध घेणे.
२) चैत्य पुरुषाभोवती अस्तित्वाच्या मन, प्राण, शरीर आदी भागांचे संयोजन करणे. - हे करण्याच्या पुढील पायऱ्या आहेत.
२.१ स्वत:विषयी आणि स्वत:च्या आंदोलनांविषयी जागरूक होणे.
२.२ स्वत:च्या हालचाली, आंदोलने, स्पंदने यांचे निरीक्षण करणे.
२.३ तुमच्या सर्वोच्च आदर्शाच्या न्यायासनासमोर त्यांना हजर करणे.
२.४ त्या न्यायासनाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानणे.
२.५ तद्विरोधी असणाऱ्या साऱ्या गोष्टीना नकार देणे.