अनरसा
अनरसा हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. पाण्यात पाच-सहा दिवस भिजवून आंबवलेले तांदूळ व गूळ यांपासून हा बनतो. त्यासाठी साजूक तूप, वेलदोडा, खसखस यांचाही वापर होतो. अनरसाच्या ओलसर पिठाच्या चकत्या तुपात तळण्यापू्वी त्यांच्यावर खसखस पसरण्याची रीत आहे. [१] हा विशेषतः दिवाळीत आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात. हा पदार्थ महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. पंजाबमध्ये बहुधा खसखस वापरत नाहीत.
अनरसा | |
---|---|
वेळ | मिनिटे |
संस्कृतमध्ये अनरश्याला अपूप म्हणतात.[२] सामान्यपणे दीपावलीच्या सणात महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये बनविल्या जाणाऱ्या विविध उपहारांतील हा एक पदार्थ आहे.[३] महाराष्ट्रात विशेषकरून अधिक मास काळात जावयाला ३३ अनारसे भेट देण्याची पद्धती आहे.